Jalna : पुराच्या पाण्यात गाडी घालण्याचं धाडस, दैव बलवत्तर म्हणून दोन तरुण वाचले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 08:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात पावसामुळे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढण्याच्या नादात दोन तरुण वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील सुकना नदीला पूर आला आणि याच नदीवरील पूल ओलांडण्याचा अट्टाहास दोन तरुणांनी केला, जो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. हे दोन्ही तरुण पाण्यात वाहून जात असल्याचे स्थानिकांना लक्षात येताच त्यांनी त्या दोघांना वाचवले आहे.