ACB Trap: आयुक्त संतोष खांडेकरांना अटक होताच कंत्राटदारांनी फोडले फटाके, '10 लाखांची लाच' घेतल्याचा आरोप
Continues below advertisement
जालना पालिका आयुक्त संतोष खांडेकर (Santosh Khandekar) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. कामाचं बिल पास करण्यासाठी तक्रारदाराकडून 'दहा लाखांची लाच' स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खांडेकरांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या अटकेनंतर, अनेक कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला, ज्यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरील रोष समोर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement