Jalna Couple Molested | आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी, वकील संघाकडून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय | ABP Majha
जालन्यातील संतापजनक घटनेनंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलं आहे. आज या सर्व आरोपींना जालना न्यायालयात दाखल करण्यात आलं. प्रेमी युगलाला मारहाण आणि मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी जालना फौजदारी न्यायालयाकडून चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या संतापजनक प्रकरणात जालना जिल्हा वकील संघाकडून आरोपीचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.