Jalna : 30 किलोमीटरची मंजुरी, 7 किलोमीटरच डांबरीकरण, तेही निकृष्ट; शिवसेनेकडून पोलखोल
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी शहागड रस्त्याच्या निकृष्ट कामाची शिवसेनेच्या तालुका प्रमुखाने पोल खोल केलीय, 30 किलोमीटर मंजूर रस्त्याचे 7 किलोमीटर डांबरीकरण झाले असून रस्ता बनवल्या नंतर डांबर हाताने उखडत असल्याचे निदर्शनास येतेय, दरम्यान तालुका प्रमुख उद्धव मरकड यांनी या रत्याच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची नासाडी होत हा रस्ता होऊ न देण्याचा इशारा दिलाय. सदर रस्ता मोठ्या रहदारीचा असून तो बनवताना अनेकांनी त्या बाबत तक्रार केली होती मात्र आज या रस्त्याचा शिवसैनिकांनी पंचनामा केला.