Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

Continues below advertisement

Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना 
जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना   आगीच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या   समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसची अनेक प्रवाशांना धडक  जळगावात रेल्वेची अतिशय मोठी दुर्घटना   अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती  

मुंबई : मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परांडा स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे. या अपघातात पन्नासहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram