Jalgaon | सत्ताधारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंदिर उघडून पूजा; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
सत्ताधारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंदिर उघडून पूजा करण्यात आली आहे. कोरोना बाधित असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोधवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा हनुमान मंदिरात होमहवन आणि पूजा केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियातून जोरदार टीका सुरु झाली आहे. तसेच पाटील यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचा खुलासा केला आहे.