Jalgaon : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या Mahavitaran च्या पथकावर ग्राहकाचा हल्ला, अभियंत्याला मारहाण
जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर ग्राहकानेच हल्ला केलाय. टिकमदास पोपटणी यांच्या थकीत बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी महावितरणच्या पथकाशी वाद घातला. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर थेट मारहाणीत झालं.