Gulabrao Patil Speech : आताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो, गुलाबराव पाटलांचे ठाकरेंना चिमटे

Continues below advertisement

आमच्यावर सातत्याने टीका होत आहे आमच्यावर टीका करण्यासाठी बदनाम करण्यासाठी काही लोक सोडण्यात आलेले आहेत, मात्र हम तो बदनाम है की बदनामी हमसे डरती है.. असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले आमच्यावर टीका करत आहेत, आधी तू काय श्राद्ध केलं ते सांग बाबा असे म्हणत  नाव न घेता सुषमा अंधारे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला.वानराची सेना म्हणून आम्हालाही हिणवलं जायचं, अशी आठवणही यावेळी गुलाबराव पाटलांनी सांगितली. मात्र बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा आज मुख्यमंत्री झाला. आता राजा हा राजाच्या पोटी जन्माला येत नाही, आताचा राजा जनतेच्या मतदानाने जन्माला येतो, असंही गुलाबराव पाटील यावेळ म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram