Jalgaon : दसऱ्याच्या शुुभमुहुर्तावर 'सुवर्णनगरी' गजबजली; जळगावात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाडेतीन मुहूर्तांपैकी प्रमुख एक मुहूर्त म्हणून दसरा सणाच्या मुहूर्त मानला जातो हा मुहूर्त शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो. या दिवशी कोणी घर, प्लॉट,वाहने,कपडे सह विविध वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असतात. जळगावच्या सुवर्ण नगरीत मात्र या दिवशी अनेक ग्राहक हे सोने खरेदीला पसंती देत असल्याचं नेहमीच पाहायला मिळत असते. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेली सोने खरेदी ही शुभ गोष्ट असते अशी जळगाव जिल्ह्यात अनेकांची श्रद्धा असल्याने अनेक कुटुंब हे आपापल्या ऐपती प्रमाणे कमी अधिक प्रमाणात दसरा शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करीत असतात.