Jalgaon शनिपेठमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्य़ाखाली अडकलेल्या आजीला वाचवण्यात यश
जळगावमध्ये पहाटेच्या सुमारास शनिपेठ परिसरातली दुमजली इमारत कोसळली. देव बलवत्तर म्हणून या इमारतीत राहणारे पाटील कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. पंच्याहत्तर वर्षीय कमलाबाई पाटील या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या होत्या.. मात्र स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची ढिगाऱ्याखालून सुटका केली. बाजूच्या इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु केल्यामुळं इमारत कोसळल्याचा आरोप पाटील कुटुंबियांनी केला आहे.
Tags :
Jalgaon