Jalgaon : जळगावमध्ये शिरपूर प्रशिक्षण केंद्रातील विमानाचा अपघात,एका वैमानिकाचा जागीच मृत्यू, एक जखमी
हेलिकॉप्टर कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ सातपुडा पर्वत रांगेत घडली आहे. ही घटना काही वेळा पूर्वीच घडली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून हे हेलिकॉप्टर कोठून कुठे जात होते, त्याचा अपघात कशा मुळे झाला,किंवा त्यातील व्यक्ती कोण याची अद्याप माहिती पोलिसांना उपलब्ध झालेली नाही. ही घटना जंगल परिसरात घडली असल्याने या ठिकाणी पोहोचण्यासाठी यंत्रणेला ही मोठे कष्ट पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.