Gram Panchayat Election Result | जळगावात कोण बाजी मारणार? खडसेंच्या कोथळी गावाकडे जिल्ह्याचं लक्ष

जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंच्यात निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया आज होत आहे. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील एकनाथराव खडसे यांच्या कोथळी गावाच्या निकालकडे संपूर्ण राज्यचं लक्ष लागले आहे त्याला कारण म्हणजे मागील काळाचा जर विचार केला तर या ग्रामपंचयातींवर भाजपाच्या माध्यमातून  एकनाथराव खडसे आणि त्यांच्या समर्थकांच वरचस्व राहिले आहे. या निवडणुकीत मात्र खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने, आता ही ग्रामपंच्यात कोणाच्या ताब्यात राहणार हा चर्चेचा विषय बनला आहे. ग्रामपंच्यात निवडणूक पक्षाच्या चिन्हावर झाली नसली तरी भाजपच्या रक्षा खडसे,एकनाथराव खडसे आणि सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असल्याने कोण बाजी मारणार या कडे सगळ्याच लक्ष लागले आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola