Gram Panchayat Election Result | कोकणाचा गावगाडा कोण हाकणार?

गावचा कारभारी कोण? याचे भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात सेनेची कामगिरी कशी राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण, सेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपनं देखील आपला मोर्चा वळवला आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी असं चित्र कोकणात दिसलं. पण, असं असलं तरी ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क कुणाचा? याच विश्वासावर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जाते. रायगडमध्ये 88 पैकी 10, रत्नागिरीत 479 पैकी 119 आणि सिंधुदुर्गात 70 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून त्यावर कुणाची सत्ता येणार? हे देखील पाहावं लागणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola