Harshal Patil : सांगलीत जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने आयुष्य संपवलं,कारण नेमकं काय?

सांगलीमध्ये जलजीवन निशुल्क काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षल पाटील असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. राज्य सरकारकडून वेळेत बिलं न मिळाल्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. सरकारकडे हर्षलची एक कोटी चाळीस लाखांची देयकं प्रलंबित होती. तसेच, हर्षलने इतर काही जणांकडून पासष्ट लाखांचे कर्ज घेतल्याची माहिती आहे. या विभागातून जवळपास एकोणनव्वद हजार कोटींची देयकं शासनाकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. "राज्य शासनाने एकोणनव्वद हजार कोटींचे देयकांची तातडीने देण्यात यावी जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याची देयकं तातडीनं द्यावी" अशी मागणी कंत्राटदार महासंघाने केली आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola