Delhi Blast : जैशच्या फरिदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाईंड अम्मार अल्वी?, यंत्रणांकडून कसून तपास
Continues below advertisement
फरीदाबाद येथील दहशतवादी मॉड्यूलचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेपर्यंत पोहोचले असून, त्याचा मास्टरमाईंड मसूद अझहरचा भाऊ अम्मार अल्वी असल्याचे समोर आले आहे. अल्वी हा २०१९ च्या पुलवामा हल्ल्याचा प्रमुख योजनाकार होता आणि त्याला २०२२ मध्ये भारताने UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, ‘ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात आत्मघाती हल्ल्यासाठी भारतीय मुसलमानांचीच निवड करण्याची त्याची रणनीती आहे’. यामागे हल्ल्यांना पाकिस्तानी पुरस्कृत न दाखवता काश्मिरी जनतेचा उठाव म्हणून चित्र निर्माण करण्याचा डाव असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित काही डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement