Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर JeM मध्ये भीती, Masood Azhar च्या भावाने 21 पैकी 8 दहशतवादी अड्डे रिकामे करण्याचे दिले आदेश.
Continues below advertisement
ताज्या वृत्तानुसार, दिल्लीतील स्फोटानंतर (Delhi Blast) पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदमध्ये (Jaish-e-Mohammed) भीतीचे वातावरण पसरले आहे. भारताने पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) कारवाईत बहावलपूरमधील (Bahawalpur) जैशच्या मुख्यालयाचे मोठे नुकसान झाले होते. आता दिल्ली स्फोटानंतर भारतीय लष्कराच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने, जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा (Maulana Masood Azhar) भाऊ अलसैफ याने दहशतवादी कमांडर्सची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारतीय सेना आता कारवाई करेल, दिल्ली स्फोटानंतर या भीतीनं जैश ए मोहम्मदच्या एकवीस दहशतवादी अड्ड्यांपैकी आठ अड्डे रिकामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे'. या महत्त्वपूर्ण बैठकीला मौलाना मसूद अझहर स्वतः उपस्थित नव्हता, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement