Faridabad Terror Arrest : लखनौमध्ये अटक झालेल्या डॉ. शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, यंत्रणा अलर्टवर

Continues below advertisement
फरीदाबादमध्ये (Faridabad) घरात स्फोटकं आणि गाडीत AK-47 आढळल्याप्रकरणी डॉक्टर शाहीन शाहिदला (Dr. Shaheen Shahid) अटक झाली आहे. जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) केलेल्या संयुक्त कारवाईत, तिचा जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिचे महाराष्ट्र (Maharashtra) आणि कानपूरमधील (Kanpur) कनेक्शनही उघड झाले असून, यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. डॉक्टर शाहीनच्या कानपूरमधील पूर्वाश्रमीच्या पतीने, डॉक्टर जफर हयातने, 'माझा तिच्याशी २०१२-१३ मध्ये घटस्फोट झाला, त्यानंतर कोणताही संबंध राहिला नाही,' असा दावा केला आहे. तिला ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये स्थायिक व्हायचे होते, मात्र आपण भारत सोडण्यास नकार दिल्याने तिने घटस्फोट घेतला, असेही डॉक्टर जफरने सांगितले. शाहीनची दोन मुले आपल्यासोबत राहत असून त्यांचाही तिच्याशी संपर्क नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola