Jairam Ramesh : हिंडनबर्ग अहवालाची सेबी आणि आरबीआयमार्फत चौकशी करा : कॉँग्रेस नेते जयराम रमेश
अदानी उद्योग समूहाने मोठय़ा प्रमाणात करचुकवेगिरी आणि आर्थिक गडबड केल्याचा ठपका हिंडेनबर्ग शोध अहवालात ठेवण्यात आला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे समभागाच्या किमती आणि कर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.त्यामुळे हिंडेनबर्ग अहवालाची सेबी आणि आरबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.