Raj Thackeray : जैन मुनी नय पद्मसागर महाराज राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर

Raj Thackeray :  जैन इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन चे संस्थापक जैन साधू गुरुदेव नय पद्मसागरजी महाराज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीला शिवतीर्थ येथे आले होते. सकाळी साडे सातच्या दरम्यान नय पद्मासगार महाराज हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. राज ठाकरे यांची सदिच्छा भेट आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नय पद्मसागर हे शिवतीर्थवर आल्याची माहिती देण्यात आली. साधारणपणे दोन तास राज ठाकरे आणि जैन मुनी नय पद्म सागर यांच्यामध्ये चर्चा झाली.

'काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' या नव्या घरात प्रवेश केला आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुनी शिवतीर्थ इथे आले होते. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. जैन परंपरेप्रमाणे राज ठाकरे यांच्या नव्या घरात 'पगला' विधी पार पडला आणि त्यासोबत नवकार मंत्रचा जप मुनींच्या माध्यमातून झाला असं  जैन इंटरनेशनल ऑर्गनाइजेशनचे पोलिटिकल हेड शैलेश मोदी यांनी माध्यमांना सांगितले. सोबतच, मुंबई आणि महाराष्ट्रात लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि राज ठाकरे यांच्याकडून काहीतरी चांगलं व्हावं, यासाठी मुनींकडून राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आल्याचं शैलेश मोदी म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola