Pigeon Politics: 'कबूतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', जैन मुनी निलेश मुनींचा थेट इशारा!
Continues below advertisement
जैन मुनी निलेश मुनी यांनी 'शांतिदूत जनकल्याण पक्षा'ची स्थापना करून राजकारणात प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यांनी मारवाडी आणि गुजराती समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले. 'कबूतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', असा थेट इशारा निलेश मुनी यांनी सरकारला दिला आहे. दादर येथील एका धर्मसभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 'हमारी जो पार्टी अभी शांतिदूत जनकल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूँ,' असे म्हणत त्यांनी पक्षाची स्थापना केली आणि पक्षाचे चिन्ह 'कबूतर' असेल असेही जाहीर केले. जेवढे पण मारवाडी आणि गुजराती असतील, त्या सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. कांद्यामुळे जसे सरकार गेले, तसे कबुतरांच्या मुद्द्यावरून सरकारला किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement