Farmer Protest : 'हा इशारा मोर्चा आहे, कर्जमुक्त केलं नाही तर महाराष्ट्रभर विरोध करू'- ठाकरे

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या 'हंबर्डा मोर्चा'त सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. हा केवळ 'हंबर्डा मोर्चा' नसून सरकारसाठी 'इशारा मोर्चा' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी न दिल्यास, केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून विरोध करतील, असा इशाराही त्यांनी दिला. दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola