Ratnagiri Boat : मच्छिमार नौका 16 दिवसानंतरही बेपत्ता, नौकेला अपघात की घातपात?
रत्नागिरीतल्या जयगड बंदरातून मच्छिमारीसाठी गेलेली नौका 16 दिवस उलटले तरी परतलीच नाही. या नौकेवरील एकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर हाती लागला, पण उर्वरित सहा जण अजूनही बेपत्ता आहेत. नौकेला अपघात झाला की घातपात हेदेखिल इतक्या दिवसांनंतर स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे मच्छिमार संतप्त आहेत. तटरक्षक दल, मत्स्य विभाग, पोलीस यंत्रणेनं शोधाशोध केली, पण काहीच हाती लागलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या नौकेला घातपात झाला असावा असा आरोप आता गावकरी करत आहेत.