Nawab Malik on ED : नवाब मलिक कोणालाही घाबरत नाही, मलिकांचं ईडीला आव्हान

Nawab Malik Press Conference : नवाब मलिकांवर ईडीने छापे मारले अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र मला ईडीच्या लोकांना सांगायचं आहे, अफवा पसरवणं बंद करा, प्रेस घ्या किंवा नोट काढून लोकांना खरी माहिती सांगा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपाचं खंडण केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अफवांचा खेळ खेळू नका, काल पुण्यात ज्या कारवाया सुरु आहेत, त्या खोट्या आहेत. वक्फ बोर्ड जमिनीवरील कारवाईवरुन अफवा सुरु आहे. जमिनी ज्यांनी हडप केल्या आहेत, त्यांचं क्लीनअप मशीन आम्ही हाती घेतलं आहे. भाजपच्या माजी मंत्र्याने जमिनी लाटल्या. या क्लीनअप मशीनला ईडी सहकार्य करेल अशी आशा आहे. मालकाला खूश करण्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न, नवाब मलिक कोणाला घाबरणार नाही, जो जो ललकारेल, त्याला करारा जबाब मिळेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola