Sanjay Raut यांच्या 'त्या' ट्वीटवर Israel संतापले, परराष्ट्रमंत्र्यांना पाठवलं पत्र ABP MAJHA
Continues below advertisement
Sanjay Raut vs Israel : खासदार संजय राऊतांच्या ट्विटवरून सध्या इस्रायल कमालीचा नाराज झालाय. इस्रायली दूतावासाने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि परराष्ट्रमंत्र्यांना कठोर भाषेत पत्र लिहीलंय. पत्रात राऊतांनी यहुदी विरोधी भूमिका घेतल्याची टीका करण्यात आलीय. गाझामधील रूग्णालयावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यावर राऊतांनी थेट हिटलरचं नाव घेत टीका केली होती. हिटलर यहुदींचा एवढा राग का करायचा हे आता समजलं असं राऊतांनी ट्वीटमधअये म्हटलं होतं. मात्र राऊतांनी ते ट्विट नंतर हटवलं. पण इस्रायलने स्क्रीनशॉटसह पत्र भारत सरकारला दिलं.
Continues below advertisement