Islamabad Blast: इस्लामाबादमध्ये कोर्टाबाहेर कारमध्ये स्फोट, 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Continues below advertisement
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या भीषण स्फोटात किमान १२ जण ठार तर २७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा स्फोट कारमधील सिलेंडरचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र नंतर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे स्पष्ट केले. एका आत्मघाती हल्लेखोराने न्यायालयाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला आणि अपयश आल्याने त्याने पोलीस वाहनाजवळ स्वतःला उडवून दिले, असे गृहमंत्री मोहसिन नक्वी (Interior Minister Mohsin Naqvi) यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये वकील आणि कामकाजासाठी आलेल्या सामान्य नागरिकांचा समावेश आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement