Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे, Amit Shah यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला आहे. या स्फोटानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक आणि एनआयएचे महासंचालक उपस्थित होते. या स्फोटाच्या अनुषंगाने सर्व तपास यंत्रणांनी नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे, 'राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) या प्रकरणाचा औपचारिक तपास करेल', असा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत देशातील अंतर्गत सुरक्षेची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement