Islamabad Blast: पाकिस्तानच्या Islamabad मध्ये कोर्टाबाहेर कार बॉम्बस्फोट, 12 ठार

Continues below advertisement
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मंगळवारी एका शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरली. इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयाच्या बाहेर झालेल्या या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. या घटनेची तुलना आदल्या दिवशी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाशी केली जात आहे, जिथे १० जणांचा मृत्यू झाला होता. इस्लामाबादमधील स्फोट एका कारमध्ये झाला आणि त्याची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या अनेक वाहनांचे आणि इमारतींचे नुकसान झाले. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा एक आत्मघाती हल्ला होता, हल्लेखोराने न्यायालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयशी ठरल्याने त्याने पोलीस वाहनाला लक्ष्य केले'. सध्या कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola