Delhi Blast: दिल्ली स्फोटात दोन तरुणांचा मृत्यू, देशभर हाय अलर्ट

Continues below advertisement
दिल्लीतील लालकिल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटात उत्तर प्रदेशातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रावस्ती येथील दिनेश मिश्रा (Dinesh Mishra) आणि अमरोहा येथील अशोक कुमार गुर्जर (Ashok Kumar Gurjar) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर भारतीय पुरातत्व खात्याने (ASI) लालकिल्ला तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मृतांपैकी एक असलेल्या दिनेश मिश्रा यांच्या भावाने सांगितले की, 'ते चावडी बाजारात कामाला होते आणि सामान पोहोचवण्यासाठी लालकिल्ला परिसरात आले होते, त्याचवेळी हा स्फोट झाला'. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मनमाड, नाशिक, जळगाव आणि शिर्डीसह प्रमुख रेल्वे स्टेशन आणि शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola