Islamabad Blast: इस्लामाबाद कोर्टाबाहेर कारमध्ये स्फोट, 5 ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
Continues below advertisement
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) मंगळवारी एका स्फोटाने हादरली. शहरातील G-11 सेक्टरमधील ज्युडिशियल कॉम्प्लेक्सच्या (Judicial Complex) बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला, ज्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, 'सिलिंडर कारच्या सिलिंडरचा स्फोट असेल तर एवढे मृत्यू कसे झाले हा देखील आता तपासाचा भाग असणार आहे,' कारण काही रिपोर्ट्स याला बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता वर्तवत आहेत. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून हा सिलेंडरचा स्फोट होता की दहशतवादी कट, याचा तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement