Nana Patole On Narendra Modi: '56 इंचाची छाती कुठे गेली?', Nana Patole यांचा Modi सरकारवर हल्लाबोल.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटावरून (Delhi Blast) राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) सुरक्षा यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे. 'भाजपच्या पद्धतीनं छप्पन्न इंचाचा सीमा दाखवून आम्हीच या देशाची सुरक्षा करू शकतो अशा पद्धतीनं खोट्या आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरशावर सत्ता घेतली,' असे म्हणत नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला. दिल्ली आणि काश्मीरमधील असुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे केंद्र सरकारचे अपयश असून त्यांनी याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी पटोले यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनीही अकोल्यातून सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement