Irshalwadi landslide : इर्शाळवाडीत आणखी एक मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 24 वर : ABP Majha
Continues below advertisement
इर्शाळवाडीत आणखी एक मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा २४ वर गेलाय . रायगडमधील इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला तीन दिवस झालेत. दरम्यान, अजून ५६ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळून इर्शाळवाडी होत्याची नव्हती झाली. ४८ पैकी १७ घरे गाडली गेलीत. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने काल इर्शालवाडीतून एनडीआरएफचे जवान वगळता सर्वाना वर येण्यास मनाई करण्यात आलीय.
Continues below advertisement