CWC25 Final: '...1983 सारखं Inspire करण्याची संधी', Irfan Pathan कडून Team India ला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा
Continues below advertisement
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women's Cricket Team) विश्वचषक फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'भारतीय महिला संघाकडे 1983 मध्ये कपिल देव (Kapil Dev) यांच्या टीमप्रमाणे देशाला इन्स्पायर (inspire) करण्याची संधी आहे,' असं इरफान पठाण म्हणाला. आयसीसी महिला विश्वचषक 2025 (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डी.वाय. पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणार आहे. त्याच दिवशी भारतीय पुरुष संघ होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामना खेळणार असला तरी, तमाम चाहत्यांनी महिला संघाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन पठाणने केले आहे. 1983 मध्ये लॉर्ड्सच्या बाल्कनीत (Lord's balcony) विश्वचषक उचलल्यानंतर भारतात क्रिकेटची लाट आली होती, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी मुलींना मिळाली आहे, असेही तो म्हणाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement