Koregaon Bhima Case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर
Continues below advertisement
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर पोहचल्या आहेत. कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर जबाब नोंदवण्यासाठी रश्मी शुक्ला 'सह्याद्री'वर पोहचल्या आहेत. निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्यासमोर रश्मी शुक्ला जबाब नोंदवणार आहेत. दंगलीच्या वेळी रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. याआधी निवृत्त न्यायाधीश जे.एन.पटेल यांच्यासमोर जबाब नोंदवण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी वेळ मागितला होता. अखेर आज रश्मी शुक्ला चौकशी आयोगासमोर हजर झाल्यात.
Continues below advertisement