100 कोटी वसुलीचे आरोप करणारे IPS अधिकारी Param Bir Singh यांच्या निलंबनाची शक्यता
१०० कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांचं लवकरच निलंबन होण्याची शक्यता आहे. परमबीर यांच्या निलंबनासंदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एकीकडे कामावर रुजू होण्यासाठी परमबीर यांनी प्रयत्न चालवला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारशी पंगा घेणाऱ्या परमबीर सिंह यांना घरचा रस्ता दाखवला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.