टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणी चौकशी समिती गठीत, अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
Continues below advertisement
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर शालेय शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचवेळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांना १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात तुकाराम सुपेंना १७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्या घरी आतापर्यंत टाकलेल्या दोन धाडींमध्ये तीन कोटी रुपयांच्या आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement