Indu Mill smarak : पुढच्या वर्षीपर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण होणार, इंदू मिलच्या स्मारकासाठी लढा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतिंना अभिवादन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दादरच्या इंदू मिलमधील आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली. इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, असं आश्वासन त्या दोघांनी दिलं. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. २०२५ सालच्या मार्च-एप्रिल महिन्यात हे स्मारक पूर्ण होईल असा अंदाज आहे.