Maharashtra : इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन, आयोजकांविरोधात गुन्हा

बीडच्या नांदुरघाटमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन केल्यानं आयोजक सुमंत धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. काल मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी नांदुर घाट मध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेतला होता ज्याला मोठी गर्दी झाली होती.. कोरोणाचे सगळे नियम या ठिकाणी मोडण्यात आले होते.. म्हणून प्रशासनाने कालच्या सोहळ्याचे  आयोजक मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 188 प्रमाणे केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.. याबरोबरच कोरोना काळात गर्दी जमवल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे मोठ्या सभा होतात आणि मनसेच्याच कार्यक्रमावर कारवाई का असा सवाल सुमंत धस यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola