Sangli : भारत-पाक युद्धात पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा सांगलीत ABP Majha
1966मध्ये भारतीय सेना दलात आलेला आणि त्यानंतर 1971 च्या पाकीस्तान युध्दात अनेक कामगिरीमध्ये सहभागी झालेला टी-55 बॅटल टैंक (रणगाडा) सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये स्थापित करण्यात आलाय. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले., 1971 च्या पाकीस्तान युध्दामध्ये पश्चिम बॉर्डरवर 36 इन्फन्टरी डिव्हीजनच्या शिंदे हॉर्स युनिटने 8 डिसेंबर 1971 रोजी शक्करगढच्या बाजुने चढाई केली होती. 10 डिसेंबर 1971 रोजी भारतीय सैन्याने शत्रूचे आठ टैंक नष्ट केले होते. या युध्दात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेनशन इन डिसपॅचेस ने सन्मानित करण्यात आले होते. असा हा वैशिष्टपूर्ण टी-55 बॅटल टँक शांतिनिकेतन लोकविद्यापीठात स्थापित करण्यात आलाय.