Bramhos Chennai : भारतीय नौदलाकडून ब्रह्मोसचं प्रात्यक्षिक, नौदलाचं जोरदार शक्तिप्रदर्शन
भारतीय नौदलाने INS चेन्नईवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रावर हल्ला करण्याच्या अचूकतेचं यशस्वीपणं प्रात्यक्षिक पार पडलंय.. विस्तारित पल्ल्याचा मार्ग पार करून आणि जटिल युक्ती पार पाडल्यानंतर क्षेपणास्त्रानं अचूक लक्ष्य गाठलंय. ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई या दोन्ही क्षेपणास्त्रे स्वदेशी बनावटीची आहेत... समुद्रात खोलवर मारा करण्याची क्षमता आणि समुद्रापासून दूर असलेल्या जमिनीवरील ऑपरेशन्ससाठी याचा मोठा फायदा होणार आहे.