Indian National Calendar : भारतीयांचं Happy New Year! कसं घडलं भारतचं स्वतःच कॅलेंडर?
संकेत वरक
Updated at:
22 Mar 2022 10:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndian National Calendar : जर आम्ही तुम्हाला म्हटलं की, चालू वर्ष हे भारतीय सौर 1944 आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही बसणार तुमचा विश्वास पण हे सत्य आहे.
आता सुरू असलेल वर्ष हे 1944 आहे. पण ते जगानं मान्यता दिलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नाही. तर भारताच्या स्वतःच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, म्हणून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर नुसार. त्याला आपण 'भारतीय सौर कॅलेंडर' देखील म्हणतो. सौर म्हणजे, सूर्यावर आधारित. होय! भारताचं स्वतः चं हे कॅलेंडर आहे. सरकारचा शासनादेश किंवा अगदी UPSC चं नोटिफिकेशन जरी तुम्ही पाहिलं तर त्यात याची नोंद असते.