CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप!
Continues below advertisement
मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी कॉल्समुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) शिफारशीनंतर, कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, 'आता मोबाईलवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकासह त्या व्यक्तीचं खरं नावही दिसणार आहे'. ही सेवा 4G आणि 5G नेटवर्कवर तात्काळ लागू केली जाणार असून, ती डिफॉल्ट स्वरूपात उपलब्ध असेल, म्हणजेच सर्व युझर्ससाठी आपोआप सुरू होईल. ज्यांना ही सेवा नको असेल, त्यांना ती बंद करण्याचा (opt-out) पर्याय निवडावा लागेल. या निर्णयामुळे स्पॅम कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना लवकरच ही सेवा सुरू करण्यास सांगितले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement