Bachchu Kadu Protest: 'CM नागपूरचे असून काय करतायत?', बच्चू कडूंच्या आंदोलनाने जनता रस्त्यावर; सरकारला सवाल

Continues below advertisement
आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात निघालेल्या 'महाएल्गार' (Maha Elgar Morcha) मोर्चाने नागपूर-वर्धा महामार्गावर (Nagpur-Wardha Highway) वाहतूक ठप्प झाली आहे. 'आज मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, त्यांनी काय करून राहिलं? काहीच करून नाही राहिलं. आम जनतेचं तर काहीच विचारच नाहीयं,' असा संतप्त सवाल आंदोलनामुळे अडकलेल्या एका नागरिकाने केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. नागपूरजवळील जामठा स्टेडियमजवळ आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने वर्धा, चंद्रपूर आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली, ज्यामुळे शेकडो प्रवासी रस्त्यावर अडकून पडले आहेत. बच्चू कडू यांनी उद्या दुपारपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले असून, पुढील दिशा बारा वाजता ठरवली जाईल. या आंदोलनाचे तीव्र परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola