Sanjay Raut : न्यायव्यवस्थेवर टीका करणं संजय राऊतांना भोवणार? बार असोसिएशननं दाखल केली अवमान याचिका
शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायव्यवस्थेवर टीका करणं भोवणार की काय अशी शक्यता निर्माण झालेय... कारण संजय राऊत यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशननं उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे... आणि यात संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलंय. किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांना कोर्टातून झुकतं माप दिलं जात असल्याचा संजय राऊतांनी आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय.