India UK FTA | PM Modi यांच्या UK दौऱ्यात ऐतिहासिक करार, भारताला मोठा फायदा!
Continues below advertisement
पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान Keir Starmer यांची भेट घेतली. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) होणार आहे. दोन्ही देशांचे वाणिज्य मंत्री पंतप्रधानांच्या उपस्थितीत करारावर सह्या करतील. भारताच्या नव्व्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमधे कुठलाही कर लागणार नाही. ब्रिटनच्या नव्वद टक्के आयातीवर भारतातही कर लागणार नाही. सध्या साठ अब्ज डॉलर्सचा व्यापारी करार असून, दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार दहा लाख कोटींवर जाईल. तीन वर्षांच्या चर्चेनंतर या करारावर सहमती झाली आहे. भारतात बनणाऱ्या Electric गाड्यांनाही ब्रिटनमधे कर नसेल. Scotch, Whisky, Gin वरील कर १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर आणला आहे, जो पुढील दहा वर्षात ४० टक्क्यांवर येईल. इंग्लंडची Cosmetics, Chocolates, Biscuits, वैद्यकीय उपकरणं भारतात स्वस्त होतील. इंग्लंडच्या गाड्यांवरील करात भारत १०० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कपात करणार आहे. इंग्लंडमधे भारतीयांच्या एक हजार कंपन्या २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि एक लाख लोकांना रोजगार देतील. वस्त्रोद्योग, Footwear, Automobiles, Gems & Jewellery, Furniture, क्रीडा साहित्य, रसायने या भारतीय उद्योगांना लाभ मिळेल. Wilson India, Arvind Limited, Bata India, Relaxo, Tata Motors, Mahindra Electric आणि Bharat Forge या कंपन्यांनाही लाभ होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement