Ganesh Visarjan | सहा फुटांवरील मूर्तीचं विसर्जन समुद्रामध्ये करण्यास परवानगी
मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. सहा फुटांवरील गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्द्यावर दिलासा मिळाला आहे. मात्र, सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करणं बंधनकारक असेल. विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी किनाऱ्याची स्वच्छता करणं स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आलं आहे. ही नियमावली पुढील वर्षीच्या माघी गणेशोत्सवापर्यंत कायम राहणार आहे. मुंबई आणि राज्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे, कारण उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न आता सुटला आहे.