Rajnath Sigh SCO Meeting : दहशतवादाचा उल्लेख नाही, राजनाथ सिंहांनी एससीओ घोषणापत्रावरील सही नाकारली
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला. बैठकीत त्यांनी दहशतवादाला विरोध करण्याची आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांचा निषेध करण्याची मागणी केली. पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्याचीही मागणी केली. भारताचे हे पाऊल द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण मानले जात आहे.