India-Pak Match Row | संजय राऊत यांचा PM Modi आणि Jay Shah यांच्यावर निशाणा, भाजपचे प्रत्युत्तर

Continues below advertisement
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देशात राजकीय सामना रंगला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी एरवी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतात, मात्र भारत-पाकिस्तान सामन्यामुळे त्यांनी पाच वाजता संबोधन केले, असा दावा राऊतांनी केला. पेहलगाम हल्ल्यानंतर होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून राऊतांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना लक्ष्य केले. साहिद जावाद फरहान याच्या अर्धशतकानंतरच्या कृतीवरूनही राऊतांनी टिप्पणी केली. भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही, यावरही राऊतांनी भाष्य केले. अमित शाह आणि जय शाह यांच्यामुळे देशाला हे भोगावे लागत आहे, असे राऊत म्हणाले. त्यांनी जय शाह यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. राऊतांच्या या टीकेला भाजपच्या नवनाथ बंग यांनी प्रत्युत्तर दिले. देशानं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पहावा यासाठी पंतप्रधान पाच वाजता बोलले, असे बंग यांनी म्हटले. बंग यांनी म्हटले की, "जयशाह यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे, कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola