Eknath Shinde | अकार्यक्षम मंत्र्यांना Shinde यांचा निर्वाणीचा इशारा, गुप्त बैठकीत कानउघाडणी!
Continues below advertisement
राज्थ पवारांनी जिल्ह्यामध्ये न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. शिंदेंनी आपल्या पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघाडणी केल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट नंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष यावरून शिंदेंनी संताप व्यक्त केला. जनता दरबार घेण्याच्या सूचना देऊनही वारंवार त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पक्षवाढीबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सोमवार ते बुधवार कॅबिनेट आणि नंतर मतदारसंघ अशा मंत्र्यांवर नाराजी व्यक्त झाली. जनतेचे प्रश्न सोडवा, अन्यथा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा या मंत्र्यांना शिंदेंकडून देण्यात आला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement