Superfast in 9Seconds Top News at 9am 8th August 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील चाकणमधील रस्त्यांची पाहणी केली. चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त चौबेंना खडसावले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यामुळे अजित पवार संतापले. चाकणला स्वतंत्र महापालिका होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. "बारामतीशी तुलना चाकणशी करू नका," असे वक्तव्य त्यांनी केले. सोलापुरात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न झाला. संशयित अमित सुरवसेसह साथीदारांना अटक करण्यात आली. कबूतरखान्यांवरची बंदी कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला. नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अकरा ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती इंडिया आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मतदार यादीतील घोळा संदर्भात हा मोर्चा आहे. राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून भेटीचे निमंत्रण आले. लेखी आणि शक्तीवरती पुरावे सादर करावेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. खोटी माहिती दिल्यास कारवाई होईल, असा इशाराही दिला. 'खालेदकर शिवाजी' या चित्रपटावरून वाद सुरू आहे. चित्रपटात शिवाजी महाराज आणि इतिहासाबाबत चुकीची विधानं केल्याचा आरोप आहे. चौकशी होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola