CWC25 Final: 'टीम इंडिया नक्कीच जिंकेल', चाहत्यांना विश्वास; सेमीफायनलमध्ये Australia ला चारली होती धूळ
Continues below advertisement
भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women's Cricket Team) आज इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे, कारण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) होत आहे. 'टीम आमची पहिल्यांदा फायनलला गेलीय आणि एकदम अगदी सर्व भारतीयांना अभिमानास्पद गोष्ट आहे की आमची ही टीम एवढ्या कष्टाने एवढा मोठा बलाढ्य संघ ऑस्ट्रेलियाला (Australia) मात देऊन आज फायनलमध्ये पोहोचली आहे,' अशा शब्दांत क्रिकेट चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. चाहते कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मानधना (Smriti Mandhana), जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि क्रांती गौड (Kranti Gaud) यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या सामन्याकडे लागले असून, भारत विश्वचषक जिंकेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाला वाटत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement